लाडकी बहीण योजना कसा भरायचा, Apply Online – ladki bahin maharashtra.gov.in 2026

{Online Form} लाडकी बहीण योजना Online Form कसा भरायचा, Apply Online @ladki bahin maharashtra.gov.in 2026

महाराष्ट्र शासनामार्फत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातील पात्र लाभार्थी महिलांना या योजनेमधून प्रति महिना 1500 रुपये देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे त्यामुळे जर तुम्ही आतापर्यंत या योजनेचा अर्ज भरलेला नसेल तर आजचा हा लेख तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे.

लाडकी बहीण योजनेचे आधी अर्ज ऑनलाईन ॲप च्या मदतीने भरता येत होते म्हणजेच आपण प्ले स्टोअर वरील नारीशक्ती दूत ॲपच्या मदतीने ऑनलाईन अर्ज करत होतो परंतु आता वेबसाईट पोर्टल https://ladakibahin.maharashtra.gov.in/ मदतीने ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत.

पोर्टल वरील अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे परंतु बऱ्याच महिलांना आणि लाभार्थ्यांना याची माहिती नसते आणि चुकीचा अर्ज भरला गेला तर फॉर्म रिजेक्ट होण्याची शक्यता असते.

अधिकृत वेबसाइटवर अर्ज करा

लाडकी बहीण योजना Online Form कसा भरायचा ladki bahin maharashtra gov in

Step 1: लाडकी बहिण योजनेचा अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट उघडा –
https://ladakibahin.maharashtra.gov.in/
Step 2: वेबसाईटच्या उजव्या बाजूला अर्जदार लॉगिन नावाचा विकल्प आहे त्यावर क्लिक करा.
ladki bahin yojana login
Ladki Bahin Yojana Login
Step 3: तुमच्यापुढे एक नवीन पेज उघडेल ज्याच्यावरती Doesn’t have account, Create account? नावाचा विकल्प देण्यात आलेला आहे त्यावरती क्लिक करा.
ladki bahin yojana login

Ladki Bahin Maharashtra Gov in Online Registration

Step 3: तुमच्या पुढे एक नवीन फॉर्म उघडेल. यावरील सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने भरायची आहे आणि ही माहिती तुम्हाला इंग्रजी भाषेमध्येच भरायची आहे.
लाडकी बहीण योजना signup form
ladki bahin yojana signup form
Step 4: सर्व माहिती व्यवस्थित पद्धतीने भरा आणि Signup नावाच्या विकल्पावर क्लिक करा.
Step 5: तुमच्या मोबाईलवर OTP पाठवण्यात येईल जो दिलेल्या जागेत टाकायचा आहे.
ladki bahin yojana mobile otp
ladki bahin yojana mobile otp
Step 6: OTP यशस्वीरित्या टाकल्यानंतर तुमची Registration प्रक्रिया पूर्ण होईल आणि तुम्ही वेबसाईटच्या मुख्य पानावरती याल.

Ladki Bahin Maharashtra Gov In 2024 Login

Step 7: लाडकी बहिण योजनेच्या वेबसाईटच्या मुख्य पानावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा अर्ज नावाचा पर्याय आहे त्यावर क्लिक करा.
ladki bahin yojana login page
ladki bahin yojana login page
Step 8: वरील पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढे आधार क्रमांक टाकण्यासाठी पर्याय येईल. तिथे आपला आधार क्रमांक टाकायचा आहे तसेच Captcha भरून Send OTP बटनावर क्लिक करायचे आहे.
ladki bahin yojana aadhar number
ladki bahin yojana aadhar number
Step 9: तुमच्या आधार नोंदणीकृत असलेल्या मोबाईलवर OTP पाठवण्यात येईल जो वेबसाईटमध्ये टाकायचा आहे.
ladki bahin yojana aadhar otp
ladki bahin yojana aadhar otp
Step 10: आपला आधार क्रमांक Verify OTP नावाच्या पर्यायावर क्लिक करून verify करायचा आहे.
Step 11: तुमच्यापुढे परत एक नवीन फॉर्म उघडेल ज्यामध्ये तुमचे आधार कार्ड अनुसार नाव असेल तसेच पुढील माहिती भरावी लागेल.
  • वडील किंवा पतीचे नाव
  • वडिलांचे नाव
  • महिलेचे लग्न पूर्वीचे नाव
  • वैवाहिक स्थिती
  • जन्मतारीख
  • महाराष्ट्रात जन्म घेतला आहे की नाही
ladki bahin yojana apply form
ladki bahin yojana apply form
Step 12: वरील माहिती भरल्यानंतर थोडे खाली स्क्रोल करा. तिथे आपल्याला अर्जदाराचा पत्ता टाकायचा आहे. त्यामध्ये अर्जदाराचा संपूर्ण पत्ता आणि इतर महत्त्वाची माहिती टाकावी लागेल.
ladki bahin yojana adress details
ladki bahin yojana adress details
Step 13: आता आपल्याला आपल्या बँक खात्याचा संपूर्ण तपशील द्यावा लागेल. त्यामध्ये बँकेचे नाव इंग्रजी भाषेमध्ये टाका आणि इतर माहिती भरा. ही सर्व माहिती पुन्हा तपासा कारण याच बँक खात्याशी संबंधित माहिती महत्त्वाची आहे.
ladki bahin yojana bank details
ladki bahin yojana bank details
Step 14: फॉर्मच्या शेवटच्या स्टेपमध्ये आपल्याला सर्व डॉक्युमेंट अपलोड करावे लागणार आहेत. त्यासाठी आपल्या डॉक्युमेंटची साईज जास्तीत जास्त पाच MB पर्यंत असावी.
  • अधिवास प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड
  • पंधरा वर्षांचे मतदान कार्ड
  • पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास ते अपलोड करा किंवा उत्पन्नाचा दाखला अपलोड करावा
  • रेशन कार्डची समोरील बाजू आणि पाठीमागील बाजू
  • अर्जदाराचे हमीपत्र
  • अर्जदाराचा फोटो
ladki bahin yojana documents upload
ladki bahin yojana documents upload

Ladki Bahin maharashtra.gov.in 2024 माहिती

माहिती तपशील
योजनेचे नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
योजनेचे उद्दिष्ट महाराष्ट्रातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिलांना मदत
लाभार्थी महाराष्ट्र राज्य महिला
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन तसेच ऑफलाइन
पहिला हप्ता 14 ऑगस्ट, 2024
अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट, 2024
अपात्रता निकष कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असणे किंवा ट्रॅक्टर वगळता इतर चार चाकी वाहन असणे यासह इतर
ऑफिशियल ॲप नारीशक्ती दूत ॲप
ऑफिशियल वेबसाईट Ladakibahin.maharashtra.gov.in

Ladki Bahin Yojana Status @ladki bahin maharashtra gov in

वरील सर्व प्रक्रियेनंतर तुमचा लाडकी बहीण योजनेचा ऑनलाइन अर्ज सबमिट केला जाईल. त्यानंतर काही दिवसांनी तुम्हाला पुन्हा वेबसाइटवर लॉगिन करायचे आहे.

अर्जदार लॉगिन विकल्पावर क्लिक करून लॉगिन केल्यानंतर यापूर्वी केलेले अर्ज या पर्यायावर क्लिक करायचे आहे. तेथे तुम्हाला तुमचा लाडकी बहीण योजनेचा अर्ज दिसेल.

या अर्जामध्ये वरच्या बाजूला तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे की बाद झालेला आहे हे कळू शकते. जर तुमचा अर्ज बाद झालेला असेल तर उपलब्ध असल्यास अर्ज Edit करून पुन्हा Submit करण्याचा पर्याय दिला जाऊ शकतो.

जर Edit बटन दिसत नसेल तर पोर्टलवर दिलेल्या सूचनांनुसार पुढील प्रक्रिया करावी.

लाडकी बहीण योजना Application Status

ऑनलाइन अर्ज Submit केल्यानंतर अर्जावर वेगवेगळे Status दिसू शकतात.

Status सामान्य अर्थ
Pending अर्ज पुढील प्रक्रियेसाठी प्रलंबित असल्याचे दर्शवू शकते.
In Review अर्जाची तपासणी किंवा पडताळणी सुरू असल्याचे दर्शवू शकते.
Approved अर्ज मंजूर झाल्याचे दर्शवते.
Reject अर्ज नाकारण्यात आल्याचे दर्शवते.
Pending to Submitted अर्जाची पुढील तपासणी किंवा प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसू शकते.
महत्त्वाची सूचना: योजनेची पात्रता, अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे, अंतिम तारीख आणि पोर्टलवरील Status यामध्ये वेळेनुसार बदल होऊ शकतात. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत पोर्टलवरील ताज्या सूचनांची तपासणी करा.

लाडकी बहीण योजना Official Website

अधिकृत वेबसाइट उघडा

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *